Ad will apear here
Next
‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात


मुंबई : मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ही सर्वोत्कृष्ट, तर ‘विठूमाऊली’ लक्षवेधी मालिका ठरली. स्टार प्रवाहच्या इतर मालिकांनीही विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावले.

अर्चना नेवरेकर फाउंडेशनतर्फे दरवर्षी संस्कृती कलादर्पण पुरस्कार देण्यात येतात. यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या रंगारंग सोहळ्यात कलाकारांनी दमदार परफॉर्मन्स सादर केले. सई देवधरची ठसकेबाज लावणी आणि गश्मीर महाजनीच्या रॉकिंग परफॉर्मन्सने उपस्थितांची मन जिंकली. मानसी नाईकच्या ‘घुमर’ने उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केला. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रूपल नंद, समीर परांजपे, ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, एकता लब्दे, सायली देवधर आणि विकास पाटील यांच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत आणखी वाढली.

‘नकळत सारे घडले’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वोत्कृष्ट अभिनेता (हरीश दुधाडे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नुपूर परुळेकर) असे पुरस्कार पटकावले. दमदार परफॉर्मन्सेस असलेला हा रंगारंग सोहळा लवकरच ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZVDBO
Similar Posts
ऑफिस बॉय झाला गीतकार मुंबई : गेल्या जवळपास एक दशकापासून ‘स्टार प्रवाह’ अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांनाही लाँच केले मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो, किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या
‘स्टार प्रवाह’वर ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा १० जूनला मुंबई : मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा ‘स्टार प्रवाह’वर १० जूनला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे.
‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नेहा आणि प्रतापच्या नात्यात नीलेशच्या रुपाने मीठाचा खडा पडणार असून, नेहाचा बालपणीचा मित्र असलेला मित्र नीलेश या मालिकेत प्रवेश करणार आहे. अभिनेता रणजित जोग नीलेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language